• Thu. May 2nd, 2024

आंतरराष्ट्रीय योगदिन 21 जून रोजी जिल्हा क्रिडा संकुलावर होणार साजरा !

Byjantaadmin

Jun 15, 2023

आंतरराष्ट्रीय योगदिन 21 जून रोजी जिल्हा क्रिडा संकुलावर होणार साजरा !
ग्रापंचायतीपासून ते जिल्हास्तरापर्यंत आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करावा-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
लातूर, दि.15 (जिमाका): ‘हर घर – आंगन योग’ ही यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची टॅगलाईन असून ‘वसुधैव कुटूंबकम् करिता योग”या संकल्पनेवर हा साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायतीपासून ते जिल्हास्तरापर्यंत सर्वांनी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले.
नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वतारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, परिविक्षाधीन आय.ए.एस.अधिकारी अमन गोयल, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, प्रजापिता ब्रम्हकुमारी संस्थेच्या पदाधिकारी, प्रभात ग्रुप व सामाजिक संस्थाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
ग्रामपंचायत, तालुका, जिल्हास्तराव होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. ग्रामीण भागातही आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग अभ्यास करण्यात यावा. त्यासाठी प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी नियोजन करावे. तसेच योग व निसर्गोपचार उपचार तज्ञ व आयुष वैद्यकीय अधिकारी यांनी योग विषयक माहिती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केल्या.
*आंतराष्ट्रीय योग दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हा क्रीडा संकुलात*
औसा रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी सात ते पावणेआठपर्यंत कॉमन योगा प्रोटोकॉल (सीवायपी) नुसार योग प्रात्यक्षिके करण्यात येणार आहेत. त्यांनतर 15 मिनिटे इतर योगाभ्यास करण्यात येणार आहे.
****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *