• Thu. May 2nd, 2024

रोपटे भेट देऊन विद्यार्थ्यांचे केले स्वागत

Byjantaadmin

Jun 16, 2023
रोपटे भेट देऊन विद्यार्थ्यांचे केले स्वागत.
नवा गणवेश, नवे दप्तर, नवी कोरी पुस्तके, नव्या वह्या, नवा उत्साह, नवखेपणातील कुतुहल अशा उत्साही वातावरणात रांगोळीच्या पायघड्यांनी महाराणा प्रताप प्रा. वि . सुळ नगर लातूर  येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्येही अनोखा उत्साह होता. ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सदस्यांच्या हस्तेप्रत्येक विद्यार्थ्याला फुलझाडांचे रोपटे भेट देऊन विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.शाळेचे प्रांगण विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेले होते.
शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात सुरू झाला. हातात रोपट्यांची भेट यामुळे चिमुकले भारावले होते. नव्या मुलांना शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी, शाळेबद्दल आपुलकी वाटावी, या हेतूने मुलांचे कौतुक करण्याबरोबरच स्वागत करण्यात आले. यावेळी बाळासाहेब बावणे यांनी विद्यार्थ्यांना रोपटे भेट देताना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हरीष राजपूत,  मुख्याध्यापिका दिपाली राजपूत, डॉ. पवन लड्डा, इम्रान सय्यद, पदमाकर बागल, नागसेन कांबळे, बाळासाहेब बावणे, तुळसा राठोड, दयाराम सुडे, पांडुरंग बोडके, अराफत पटेल, जुनेद शेख, कु. सारा सय्यद, कु. रिदा सय्यद, मोईझ मिर्झा, शिक्षक, शिक्षिका, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना १२० मोगरा, कुंदा, जास्वंद ची फुलझाडे देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *