• Thu. May 2nd, 2024

शंखी गोगलगायीचे करा एकात्मिक व्यवस्थापन

Byjantaadmin

Jun 16, 2023

शंखी गोगलगायीचे करा एकात्मिक व्यवस्थापन

लातूर  (जिमाका): सोयाबीन व कापूस या सारख्या पिकांमध्ये रोप आवस्थेतच गोगलगायींचा प्रादुर्भाव होत असल्याने मोठ्याप्रमाणात नुकसान होवू शकते. गोगलगाय ही कीड निशाचर असून रात्रीच्या वेळी पिकांच्या रोपव्यस्थेत पानासहीत संपूर्ण रोप खवून टाकते. त्यामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांनी या गोगलगायींचा प्रादुर्भाव सुर्योदयापुर्वी व सांयकाळी ओळखून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे जेणेकरून पुढिल नुकसान टाळणे शक्य होईल.

गोगलगायींचे नियंत्रण

रात्रीच्या वेळी कलतानी पोते 10 लिटर पाण्यात एक किलो गूळ टाकूण भिजवावे. प्रति एकरी 4 ते 4 ठिकाणी ठेवावे. सकाळी या कलतानी पोत्याखाली जमा झालेल्या गोगलगायी मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकून नष्ट कराव्यात.

शेतातील बांध स्वच्छ ठेवावेत

शेताभोवती किंवा बागेभोवती तसेच बांधापासून आत कोरड्या राखेचा अथवा चुन्याचा १० सेंटीमीटर रुंदीचा पट्टा गोगलगायींना शेतात जाण्यापासून प्रतिबंध म्हणून व नियंत्रणासाठी टाकावा. फळबागेमध्ये झाडाच्या बुडास 10 टक्के बोडॉपेस्ट लावण्यानंतर गोगलगायी झाडांवर चढत नाहीत. या व्यतिरिक्त अंड्याच्या टरफलाचा चुरा, कोरडी राख, बोरीक पावडर इत्यादी वापर गोगलगायीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी करता येतो.

सांयकाळी किंवा सुर्योदयाच्या वेळी शेतातील गोगलगायी गोळा करून नष्ट कराव्यात. गोगलगायी जमा करताना अथवा हाताळताना उघड्या हाताने न करता हात मोजे व तोंडावर मास्क घालून करणे गरजेचे आहे. जैविक व्यवस्थापनामध्ये लिंबोळी पावडर 8 किलो प्रतिएकर किंवा लिंबोळी पेंड 20 किलो प्रतिएकर तसेच 5 टक्के लिंबोळी अर्क या वनस्पतीजन्य किटकनाशकांचा वापर केल्यास गोगलगायी शेतात येण्यापासून परावृत्त होतात.

गोगलगायींचे राससनिक नियंत्रण

लहान शंखी गोगलगायीच्या नियंत्रणासाठी  10 टक्के मिठाचे (100 ग्रॅम प्रतिलिटर पाणी फवारणी आवश्यक आहे.) मेटाल्डीहाईड दाणेदार 2 किलो प्रतिएकर या प्रमाणे शेतात पसरून द्यावे, तर फळबागेमध्ये झाडाखाली  दानेदार मेटाल्डीहाईड प्रतिझाड 200 ग्रॅम पसरुन टाकावे. मेटाल्डीहाईडचा वापर जास्त तापमान व कमी आर्द्रता असल्यास कमी दिसून येतो. गोगलगायीच्या प्रतिबंधासाठी स्नेलकिलचा वापर करावा. ज्या भागात गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल त्या भागातील शेतकरी एकत्रित येवून सामूहिकरीत्या उपाययोजना पावसाळ्याच्या सुरुवातीपासून केल्यास गोगलगायीचे नियंत्रण अधिक प्रभावीपणे होते, आत्माचे प्रकल्प संचालक सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *