• Wed. May 1st, 2024

चिंचोली (काजळे )येथे शिवसेनेचे आरोग्य चिकित्सा व रक्तदान शिबिर

Byjantaadmin

Jun 17, 2023

चिंचोली (काजळे )येथे शिवसेनेचे आरोग्य चिकित्सा व रक्तदान शिबिर

– शिवसेनेचे औसा तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे यांच्या हस्ते झाले उदघाटन

लातूर- शिवसेना वर्धापन दिन व शिवसेना नेते युवासेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना लातूर जिल्हा संपर्कप्रमुख श्री.रोहीदासजी चव्हाण साहेब,शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने व माजी आमदार दिनकरराव माने
यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका प्रमुख तानाजी सुरवसे यांच्या पुढाकाराने संपूर्ण औसा तालुक्यात हिंदुह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतून लातूर जिल्हा शिवसेना व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे शिवसेना उपनेते तथा मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर यांच्या सूचनेवरून औसा तालुक्यातील 105 गावामध्ये 14 ते 19 जून या कालावधीत आरोग्य चिकित्सा, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिरे घेण्यात येत आहेत. आज चवथ्या दिवशी १७ जून रोजी चिंचोली काजळे या गावात आरोग्य चिकित्सा व रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
चिंचोली काजळे येथील या शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले.
.यावेळी लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या टीमचे डॉ.रवींद्र चव्हाण ,डॉ. शरद चव्हाण ,डॉ. शुभम भोसले हे सर्व डॉक्टर्स तसेच लातूर ब्लड बँकेचे डॉ. नयन पाटील व त्यांची टीम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आरोग्य व नेत्र तपासणी शिबाराबद्धल माहिती देत औसा तालुक्यातील सदर आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे यांनी केले.
तसेच या शिबिरामध्ये सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, गुडघेदुखी, कंबर दुखी या सर्व तपासण्या होऊन त्याच ठिकाणी नागरिकांना औषध उपचार देण्यात आले.
यावेळी औसा विधानसभेचे उपजिल्हाप्रमुख विनोद आण्णा आर्य, जिल्हा महिला संघटीका जयश्रीताई उटगे, , बजरंग दादा जाधव, उपतालुका प्रमुख, आबासाहेब पवार, उपतालुका प्रमुख श्रीराम कुलकर्णी, उप तालुका प्रमुख संतोष सुर्यवंशी, माजी तालुकाप्रमुख संजय उजळमबे माजी जिल्हा परीषद सदस्य राजेंद्र आबा माने, माजी पंचायत समिती सदस्य विनोद भैया माने,
सर्कल प्रमुख महादेव साळुंखे, माजी युवा सेना शहर प्रमुख गणेश गायकवाड , सोमनाथ कांबळे, राजू मुगावे, मा.सरपंच विवेकानंद पाटील काकासाहेब पवार, मोहन सुर्यवंशी, सचिन गोरे,सचिन साळुंके, शाखा प्रमुख तानाजी पाटिल, महेश पाटिल , बळी जाधव, महेश गुरव,सलीम माळकोंडजे, करीम तांबोळी, संदीप सुर्यवंशी, महादेव पाटील, व्यंकट जाधव, किशोर शेलार व शिवसैनिक गावकरी उपास्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *