• Wed. May 1st, 2024

रुग्णालयांना औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्या- मुख्यमंत्री

Byjantaadmin

Jun 18, 2023

 मुंबई,: राज्यातील शासकीयनिमशासकीय आरोग्य संस्थांसाठी औषधेवैद्यकीय उपकरणे यांच्या खरेदीमध्ये सुसूत्रता ठेवण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामार्फत पारदर्शक पद्धतीने खरेदी प्रक्रिया राबवावी. रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची पहिली बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजनआरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंतमुख्य सचिव मनोज सौनिकवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीरआरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आदी यावेळी उपस्थित होते.

            सार्वजनिक आरोग्यवैद्यकीय शिक्षण विभागासाठी लागणारी औषधेवैद्यकीय उपकरणे यांची खरेदी करण्यासाठी प्राधिकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या आठ वरिष्ठ पदांना आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी या प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील. सध्या आरोग्य विभागाच्या आयुक्तांना या पदाचा तात्पुरता कार्यभार देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हे प्राधिकरण म्हणजे क्रांतिकारक पाऊल असून त्याच्या स्थापनेमागचा हेतू चांगला आहे. त्यामाध्यमातून रुग्णालयांनाआरोग्यसंस्थांना वेळेवर औषधे आणि उपकरणे उपलब्ध झाले पाहिजे. प्राधिकरणाची प्रक्रिया पारदर्शक ठेवावीअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            प्राधिकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे या संस्थेची विश्वासार्हता वाढवावी. त्याची कार्यपद्धती पारदर्शक राहिल्यास खासगी रुग्णालये देखील या प्राधिकरणाच्या माध्यमातून औषधे खरेदी करू शकतीलअसे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्राधिकरणाचा कार्यक्रम आराखडा२७०० विविध औषधे आणि साहित्य खरेदीकंत्राटी पद्धतीने पदभरती आदी बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे सचिव नविन सोनावैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी जोशीआरोग्य आयुक्त धीरज कुमार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *