• Sun. May 5th, 2024

‘छापखान्यातून गायब झालेले ८८ हजार कोटी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात वापरले?’ राऊतांचा गंभीर आरोप

Byjantaadmin

Jun 18, 2023

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या शिबीरात बोलताना राऊतांनी जोरदार निशाणा साधला. २०१६मध्ये नोटांच्या कारखान्यात छापलेल्या तब्बल ८८ हजार कोटींच्या नोटा गायब झाल्याचा आरोप होत आहे.या नोटा महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ करण्यासाठी वापरण्यात आल्या का? असा सवार संजय राऊतांनी विचारला आहे. यावेळी बोलताना संजय राऊतांनी एकनाथ शिंदे- फडणीस यांच्यासोबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर देखील हल्लाबोल केला आहे.

मुंबईत लूटालुट चालली आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत लुट सुरू आहे. या लुटीच्या कथा ऐकून दोन ओळी सुचतात. दो मस्ताने चले जिंदगी बनाने चुना लगाके पुरा देश डुबाने. बरं जसे हे दोन मस्ताने दिल्लीत आहेत तसे महाराष्ट्रात देखील आहेत. जे महाराष्ट्र, मुंबई लुटतायेत, असे संजय राऊत म्हणाले.

नाशिक, बंगळूरू आणि देवस मध्यप्रदेश येथे नोटा छापण्याचे सरकारचे कारखाने आहेत. तेथून ८८ हजार कोंटींच्या नोटा बेपत्ता झाल्या. छापलेल्या नोटांचे ट्रक गायब झाले हे ट्रक गेले कुठे? ८८ हजार कोटी रुपये नाशिक, देवास आणि बंगळूरू या तीन नोटा छापण्याच्या कारखान्यातून गायब होतात, मग मी असं म्हणतो आमच्या महाराष्ट्रात जो खेळ झाला त्यासाठी हे पैसे वापरले नाहीत ना? आजही याला फोड त्याला फोड हा खेळ चालू आहे.

बाईना फार घाई होती…

पुढे बोलताना उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात दाखल झालेल्या मनिषा कायंदे यांच्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की मला कोणीतरी सांगितलं आपल्याकडल्या एक बाई गेल्या, त्या बाईला घाई फार होती मला माहिती आहे. त्या आल्याही घाई घाईत आणि गेल्याही घाईत, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

टांचं प्रकरण काय आहे?

नाशिक, देवास आणि बंगळूरू येथील सरकारी छापखान्यातून ५०० रुपयांच्या अब्जावधी मुल्याच्या नोटा गायब झाल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरबीआयच्या २०१६-१७ आर्थिक वर्षाच्याअहवालातही नोटा गायब झाल्याचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. छपाई केलेल्या नोटांपैकी ७, २६० दशलक्ष नोटा रिझर्व्ह बँकेत पोहोचल्याच नाहीत. गायब झालेल्या ५०० रुपयांच्या सर्व नोटा नवीन डिझाईनच्या आहेत. या नोटांचं एकत्रित मूल्य तब्बल ८८ हजार कोटी रुपये इतके आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *