• Sun. May 5th, 2024

भाजपच्या पावलावर बीआरएसचे पाऊल, त्यांच्याच बालेकिल्ल्यातून सुरुवात

Byjantaadmin

Jun 18, 2023

०१४च्या निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षाने सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून देशात सत्ता आणली. भाजपच्या पावलावर पाऊल ठेऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री यांचा बीआरएस पक्ष देशभर पसरण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याची सुरुवात त्यांनी महाराष्ट्रातून आणि भाजच्याच बालेकिल्ल्यातून केली आहे.

भारत राष्ट्र समिती पक्षाच्यावतीने राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर नांदेड येथे आयोजित करण्यात आले होते. बीआरएस पक्षाला राष्ट्रीय स्तरावर वाढवण्यासाठी के. चंद्रशेखर राव यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यातल्या त्यात विदर्भातून ही सुरूवात करण्यावर त्यांचा भर आहे.

गुरुवारी (ता. १५) नागपुरात बीआरएसच्या कार्यालयाचे उद्घाटन करून आणि कार्यकर्ता मेळावा घेऊन बीआरएसने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. या दिवशी विमानतळापासून ते सुरेश भट सभागृहापर्यंत रस्ते, चौक गुलाबी झाले होते. तेलंगणाच्या योजनांचे पोस्टर्स जागोजागी लावण्यात आले होते. इतके की, दुसऱ्या दिवशी ट्रक भरून भरून ते नेण्यात आले.

सध्या घड्याळाच्या तास काट्याप्रमाणे ते चालत असल्याचे दिसते. भविष्यात मिनिट काटा त्यानंतर सेकंद काट्याचा वेग पकडण्याचे बीआरएसचे प्रयत्न दिसताहेत. हे सर्व सुरू असताना पक्ष सोशल मीडियावर चांगले लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी कधी काळी आम आदमी पक्षाची सोशल मीडियाची धुरा सांभाळलेले जयंत भरत देशमुख यांची सोशल मीडियाच्या राष्ट्रीय प्रभारीपदी नियुक्ती केली.

अवघ्या पंधरा दिवसांमध्ये केसीआर यांच्या टिमने संपूर्ण महाराष्ट्रभर सोशल मीडियाचे नेटवर्क तयार केले. त्या माध्यमातून तेलंगणा सरकारच्या योजना महाराष्ट्रातील जनतेला सांगितल्या जात आहेत. त्यामुळे येत्या काळात बीआरएसने सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या प्रचारात आघाडी घेतली, तर नवल वाटायला नको.

रयथू बंधू, रायथू विमा, घराघरांत पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि सर्व farmers मोफत वीज योजना, यासारखे शेतकरीभिमुख कार्यक्रम महाराष्ट्रात राबविण्यात आलेले नाहीत, जे राबवण्याचे बीआरएसचे ध्येय बीआरएसचे असल्याचे सोशल मिडियाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचवण्याचे काम सुरू झाले आहे.

maharashtra  तरुण, शेतकरी यांना पद्धतशीरपणे तेलंगणा मॉडेल सांगण्याचे काम बीआरएसची सोशल मीडिया टीम करत आहे. याशिवाय पक्षात नवीन कार्यकर्त्यांच्या नोंदणीसाठीही सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. याच माध्यमातून गावपातळीवर पक्ष नेण्याचे काम सुरू आहे.

बीआरएसच्या सोशल मीडियाचे जाळे लवकरच देशभर वाढवले जाणार आहे आणि त्यासाठी संघटनात्मक तयारी सुरू झालेली आहे. येत्या काळामध्ये सर्वात सक्षम असा पर्याय म्हणून बीआरएस पक्ष india  निर्माण होईल आणि ते करण्यासाठी सोशल मीडियाचा सकारात्मक पद्धतीने वापर केला जाईल, असेही देशमुख यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *