• Sun. May 5th, 2024

‘ई-केवायसी’ प्रमाणीकरणसाठी दोन दिवस विशेष शिबीर

Byjantaadmin

Jun 18, 2023

‘पीएम किसान’ योजनेतील लाभार्थ्यांच्या

‘ई-केवायसी’ प्रमाणीकरणसाठी दोन दिवस विशेष शिबीर

  • गावोगावी शिबीर; ई-केवायसी, बँक खाते संलग्न केले जाणार

लातूर, दि. 18 (जिमाका): प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत 14 व्या हप्त्याचे वितरण जून महिन्यात होत आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी बँक खाते आधार संलग्न करणे आणि ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक असून यासाठी 20 व 21 जून 2023 रोजी प्रत्येक गावांमध्ये कृषि विभागामार्फत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या शिबिरात सहभागी होवून बँक खाते आधार संलग्न करणे आणि ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी केले आहे.

कृषि आयुक्तांच्या आदेशानुसार पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करणे आणि ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी 20 व 21 जून रोजी गावोगावी कृषि सहाय्यकांमार्फत सकाळी 8 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. या शिबिरामध्ये कृषि विभाग, आत्मा यंत्रणा, पोस्ट, बँका तसेच सामाईक सुविधा केंद्र (सीएससी) सहभागी होणार आहेत. या शिबिराची पूर्वतयारी कृषि विभागामार्फत युद्धपातळीवर सुरू असून कृषि सहाय्यकांना गावे वाटप करून त्यांच्याकडे प्रलंबित लाभार्थ्यांच्या याद्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

प्रलंबित लाभार्थ्यांनी शिबिरामध्ये सहभागी होऊन त्यांची ई-केवायसी करण्यासाठी कृषि विभागाच्या मदतीने पीएम किसान पोर्टलवरील ‘फार्मर्स कॉर्नर’मधील ई-केवायसी – ओटीपी आधारित सुविधेद्वारे अथवा सामायिक सुविधा केंद्र (सीएससी)च्या मदतीने अथवा प एम किसानच्या नवीन अॅपद्वारे ‘फेस ऑथेंटिकेशन’च्या माध्यमातून ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे. तसेच संबंधित लाभार्थ्याला बँक खाते आधार संलग्न करायचे असल्यास विशेष शिबिरामध्ये बँकेच्या सहकार्याने बँक खात्यास आधार क्रमांक संलग्न करावा. या शिबिरावेळी पोस्टमास्तर यांचेमार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) खाते उघडण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती श्रीमती शिंदे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *