• Sun. May 5th, 2024

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करण्याचा प्लॅन; भाजप नेत्याचा दावा

Byjantaadmin

Jun 18, 2023

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भावी मुख्यमंत्री पदाच्या चर्चा रंगल्या आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. असे असतानाच पुढच्या वेळी महाराष्ट्रात सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करण्याचा महाविकास आघाडीचा प्लॅन आहे, असा खळबळजनक खुलासा भाजप प्रदेशाध्यक्ष  bawankule यांनी केला आहे.

Maharashtra Politics:

नागपूरमध्ये आयोजित एका मेळाव्यात बोलताना बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे. ” शिंदे गटातील आमदारांनी ५० खोके घेतल्याचे आरोप केले जात आहेत. पण पण हे आरोप खोटे आहेत. पण उद्धव ठाकरेंच्या सरकारमधील शिवसेनेचे आमदार किमान ५० वेळा भेटले असतील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी कायम राहिले तर आम्ही ६५ चे १० झाल्याशिवाय राहणार नाही. कारण NCP शिवसेना संपवण्याचा विडाच उचलला आहे, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

बावनकुळे म्हणाले की, “पुढच्या वेळी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असतील, असा महाविकास आघाडीमध्ये ठरलं आहे. २०२४मध्ये सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी निश्चित केला होता. आगामी निवडणुकीत शिवसेनेचे कमी आमदार निवडून आणायचे, असेही ठरले होते. ही गोष्ट समोर आल्यामुळे शिवसेनेतील आमदारांनी उठाव केला,’ असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ‘

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *