• Tue. May 7th, 2024

 हासोरी गावच्या पुनर्वसनासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आवाज उठवणार- जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने

Byjantaadmin

Jun 19, 2023

हासोरी गावच्या पुनर्वसनासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आवाज उठवणार- जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने

 

निलंगा/प्रतिनिधी
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय ना. अंबादास दानवे साहेब यांच्याकडे हसोरी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असताना हासोरी बु व खुर्द या दोन्ही गावातील ग्रामस्थ भयभीत होते शासनाकडे वारंवार विनंती करून शासन याकडे लक्ष देत नव्हतं.परंतु शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांनी तमाम ग्राम ग्रामस्थांना सोबत घेऊन चार दिवस उपोषण केल्यानंतर दोन्ही गावातील तमाम नागरिक व माता भगिनी हे रस्त्यावर उतरल्यानंतर शिवसेनेच्या हिसक्यामुळे प्रशासन जागं झालं शासनालाही जाग आली आणि या विभागाच्या उपजिल्हाधिकारी शोभा जाधव व तहसीलदार निलंगा यांनी भूकंप झाल्याचे मान्य करून लवकरात लवकर तात्पुरता निवारा उपलब्ध करून देऊ अशी हमी लेखी दिल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने व गावातील ग्रामस्थ यांनी उपोषण मागे घेऊन शासनाला विनंती केली की लवकरात लवकर तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यात यावा.परंतु प्रशासनाच्या चुकीच्या अहवालामुळे शासनाने प्रत्येक कुटुंबाला 45 हजार रुपये इतकी रक्कम तात्पुरत्या निवाऱ्यासाठी जाहीर केलेली आहे.परंतु सदरील रक्कम अत्यंत तुटपंजी एवढ्या रकमेत कसल्याही प्रकारचा तात्पुरता निवारा उभा राहू शकत नाही.आणि म्हणून हासोरी येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे शिष्ट मंडळ शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्याकडे येऊन या रकमेमध्ये आम्ही समाधानी नाही आहोत अशी भावना व्यक्त केल्यानंतर जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी सदरील गावचे शिष्टमंडळ घेऊन निलंगा तालुक्याचे तहसीलदार यांना या संदर्भात लेखी निवेदन दिले आहे.तसेच उपोषण माघारी घेत असताना उपविभागीय अधिकारी शोभा जाधव तहसीलदार सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता यांनी लेखी पत्र देऊन कळवले होते की हासोरी गावासाठी 10 कोटी 50 लाख रुपये इस्टिमेट तयार केलेले ही दाखवलं आणि या पद्धतीने अंमलबजावणी होईल अशी आश्वासन दिले होते परंतु तसे न करता फक्त 45 हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला गृहीत धरून जो निर्णय घेतला आहे तो निर्णय अत्यंत चुकीचा असून शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात आज दिनांक 18 जून 2023 रोजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय ना. अंबादास दानवे साहेब यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून हासोरी गावाला तात्पुरता निवारा व्यवस्थित पद्धतीने करून देण्यासाठी किमान 14 कोटी रुपये आवश्यक आहेत आणि आता पावसाळ्याला सुरुवात होणार असून कदाचित मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर या दोन्ही गावातील घरे भूकंपाच्या धक्क्यामुळे कमकुवत होऊन खिडकीळ झालेली आहेत एखाद्या मोठ्या पावसात या गावातील 80 ते 90 टक्के घर कोसळतील आणि फार मोठा धोका होईल.आणि जर हे होऊ द्यायचं नसेल तर शासनाने हासोरी खु. व बू. या दोन्ही गावातील ग्रामस्थाचं योग्य पद्धतीने पूर्णपणे पुनर्वसन केलं पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी विरोधी पक्ष नेते सन्माननीय अंबादास दानवे साहेब यांच्याकडे केली आहे. सन्माननीय विरोधी पक्षनेते दानवे साहेब यांनी निश्चितच यासंदर्भात शासनाला जाब विचारू आणि ग्रामस्थांना योग्य तो न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *