• Tue. May 7th, 2024

पुण्यात ३६ किलो गांजा सापडला, बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेणारा २३ वर्षीय विद्यार्थी ताब्यात

Byjantaadmin

Jun 20, 2023

पुणे : गडचिरोलीवरुन विक्रीसाठी आणलेला ३६ किलोचा गांजा पुण्यात जप्त करण्यात आला. जवळपास ७ लाख २७ हजार २०० रुपये इतक्या किमतीचे अंमली पदार्थ खंडणी विरोधी १ च्या पथकाने हस्तगत केले आहेत. गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गांजा विक्री करणारा तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. यापूर्वीही त्याने दोन वेळा गांजा विक्रीसाठी आणला असल्याची माहिती आहे. १८ जून रोजी खंडणी विरोधी पथकाला एक इसम गांजा विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचत तरुणाला ताब्यात घेतलं. पोलिसांनी दोन वेगळ्या बसमधून आणलेला सव्वासात लाख रुपये किमतीचा ३६ किलो गांजा हस्तगत केला. यामुळे पुण्यातली तरुणाई अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडत असल्याची चर्चा सुरु आहे.

Pune Marijuana BBA Student

पंकज सलियार मडीवा (वय- २३ वर्ष, रा. शिवगोरक्ष व्हिला, आंबेगाव बुद्रुक, पुणे, मूळगाव कोचरी गडचिरोली) असे या अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात वाढत असलेल्या अंमली पदार्थ विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक यांनी खडक पोलिसांना निर्देश दिले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी देखील तपासाचा वेग वाढवत अनेक अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना ताब्यात घेतले आहे.त्याच अनुषंगाने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालणारे खंडणी विरोधी एक पथकाचे पोलीस अंमलदार विजय कांबळे यांना बातमी मिळाली की एक इसम आंबेगाव येथे एव्हिएशन कॉलेजसमोर मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी आणणार आहे. त्या अनुषंगाने खंडणी एक विरोधीच्या पथकाने सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३६ किलो वजनाचा तब्बल आठ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. तरुणावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.अंमली पदार्थाचे सेवन करण्यामध्ये तरुणांमध्ये सर्वाधिक प्रमाण दिसत आहे. आणि भारती विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांचं राहण्याचं प्रमाण मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे विक्री करण्यासाठी तस्कर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतात. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी बरोबर इतर साथीदारांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. त्या अनुषंगाने पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *