• Sun. May 5th, 2024

थोरात-कोल्हेंची होमग्राऊंडवरच विखे पाटलांना धोबीपछाड; ‘गणेश’वर एकहाती सत्ता

Byjantaadmin

Jun 20, 2023

गणेश सहकारी साखर कारखान्यावर गेल्या आठ वर्षांपासून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची असलेली सत्ता आज माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी हिसकावून घेतली. आज (ता. १९) झालेल्या मतमोजणीत त्यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन मंडळाने १९ पैकी अठरा जागा जिंकून दिमाखदार विजय संपादन केला. vikhe patil यांच्या गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. आज सकाळी नऊच्या सुमारास मतमोजणीस सुरुवात झाली. सरासरी सहाशे ते सातशे मतांच्या फरकाने थोरात-कोल्हे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला.

Ganesh Sugar Factory Result

गटनिहाय मतमोजणी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांनी काम पाहिले. सकाळी अकराच्या सुमारास शिर्डी गटातील मतमोजणी सुरू होताच निवडणुकीचा कल थोरात-कोल्हे गटाच्या बाजूने असल्याचे संकेत मिळाले. त्याची चाहूल लागल्याने विखे गटाच्या कार्यकर्त्यांनी घराकडे परतणे पसंत केले.

गटनिहाय निकाल जाहीर होताच परिवर्तन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. या मंडळाच्या विजयी उमेदवारांचा वीरभद्र मंदिराच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत सत्कार करण्यात आला. या सभेत balaseheb  thorat सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, आमदार नीलेश लंके, माजी आमदार डॉ सुधीर तांबे आदी उपस्थित होते.

गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी विखे पिता-पुत्रांच्या दहशतीचे झाकण उघडले. गणेशमधील सत्तांतर हे त्याचेच लक्षण आहे. सभासदांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही गणेशच्या माध्यमातून समृद्धी आणण्याचा प्रयत्न करू, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

गणेश कारखान्याच्या सभासदांनी दिलेला कौल मी आजोबा माजी मंत्री (कै.) शंकरराव कोल्हे यांच्या स्मृतीला समर्पित करतो. या निकालामुळे कार्यकर्ते आणि सभासदांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गणेश कारखाना चांगला चालवून आपण या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सभासदांना सोबत घेऊन पुढाकार घेऊ, असे परिवर्तन मंडळाचे नेतृत्व करणारे युवा नेते विवेक कोल्हे म्हणाले.

गणेशच्या निवडणुकीत मतदारांनी विखे पिता-पुत्रांची दडपशाही झुगारून दिली, असा हल्लाबोलNCP आमदार नीलेश लंके यांनी केला. त्यामुळे मतदारांचे आभार मानण्यासाठी आपण शिर्डी आणि राहात्यात आलो आहोत, असेही लंके यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *