• Sat. May 4th, 2024

पहिल्याच गळीत हंगामात २५६५ रुपयाचा भाव देणारा महाराष्ट्रातील पहिलाच अंबुलगा साखर कारखाना -आ.निलंगेकर

Byjantaadmin

Jun 21, 2023
पहिल्याच गळीत हंगामात २५६५ रुपयाचा भाव देणारा महाराष्ट्रातील पहिलाच अंबुलगा साखर कारखाना -आ.निलंगेकर
निलंगा / प्रतिनिधी : गेल्या बारा वर्षापासून बंद असलेला साखर कारखाना यंदाच्या गळीत हंगामात सुरू झाला असून पहिल्याच गळीत हंगामात २५६५ रुपयाचा भाव देणारा महाराष्ट्रातील पहिलाच अंबुलगा साखर कारखाना असल्याची माहिती माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अंबुलगा सहकारी साखर कारखाना बंद पडल्यापासून निलंगा मतदारसंघातील उसाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून भेडसावत होता. या काळामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या ही केल्याचे उदाहरणे डोळ्यासमोर आहेत ऊस रानावर पडून होता. कारखाने ऊस घेऊन जात नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतामध्ये १८- १८ महिने राहत होता. त्यातच नैसर्गिक आसमानी संकटाला वारंवार या भागातील शेतकरी तोंड देत आहे गेल्या वर्षी हा साखर कारखाना ओंकार शुगरच्या मदतीने चालू करून त्यातही सर्वाधिक भाव देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. असेही ते यावेळी म्हणाले.
वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना वाढीव भावाची भेट
यावेळी ओंकार शुगर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील म्हणाले या कारखान्याच्या पहिल्याच गळीत हंगामात २५६५ रुपयाचा शेतकऱ्यांना भाव दिला असून आज पासून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील ज्या शेतकऱ्यांनी मार्चपूर्वी ऊस घातला आहे अशा शेतकऱ्यांना २२०० रुपयाचा भाव मिळाला होता परंतु उर्वरित ३६५ रुपये ही त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचेही यावेळी म्हणाले आपण सर्वाधिक वाढीव दिलेला भाव म्हणजे आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना दिलेली भेट आहे असे सांगत ते पुढे म्हणाले की गेल्या वर्षीचा पहिलाच गळीत हंगाम सुरू करण्यास तांत्रिक बाबीमुळे कारखाना उशिरा सुरू झाला मात्र आगामी गळीत हंगामात पूर्ण क्षमतेने कारखाना चालवणार व परिसरातील शेतकऱ्यांना योग्य पूर्णता न्याय देणार. त्या सोबतच सीएनजी प्रकल्प इथेनॉल प्रकल्प,CNG प्रकल्प  व खत निर्मिती प्रकल्प या चालू आगामी गळी हंगामात यशस्वीपणे चालू करणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले. या पत्रकार परिषदेस माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, माजी चेअरमन दगडू सोळुंके, शेषराव माळे, सत्यवान धुमाळ ,अरविंद चव्हाण आदींसह पदाधिकाऱ्याची यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *