• Sat. May 4th, 2024

शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा -माजी आमदार दिनकरराव माने

Byjantaadmin

Jun 21, 2023
शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा -माजी आमदार दिनकरराव माने
  औसा;   शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे  यांच्या प्रेरणेतून शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे  व शिवसेना उपनेते तथा मराठवाडा समन्वयक  विश्वनाथजी नेरुळकर यांच्या सूचनेवरून शिवसेना लातूर जिल्हा संपर्कप्रमुख व  माजी आमदार दिनकरराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने  यांच्या नेतृत्वाखाली तुंगी तालुका औसा येथे नेत्र चिकित्सा आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न झाले यावेळी या शिबिराचे उद्घाटक औसा तालुक्याचे माजी आमदार दिनकरराव माने  होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने  होते यावेळी माजी आमदार दिनकरराव माने  म्हणाले की शिवसेना हे 80 टक्के समाजसेवा 20 टक्के राजकारण करणारी संघटना असून आज शिवसेनेच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आलेला आहे समाजातल्या सर्वसामान्य घटकातल्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा आपलंसं वाटणारी शिवसेना आहे शिवसेनाप्रमुखांनी दिलेले विचार हे समाज उपयोगी आहेत आम्ही समाजाचे देणे लागतो या भावनेतून सदरील शिबिराचा आयोजन करण्यात आलेला आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आव्हान माजी आमदार दिनकरराव माने साहेब यांच्याकडून करण्यात आले
 कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने  म्हणाले की या आरोग्य शिबिरामध्ये गावातील गोरगरीब गरजू लोकांना लाभ देण्यासाठी या शिबिराचा आयोजन केलेला असून फक्त दोनशे रुपये मध्ये चष्मा कसल्याही प्रकारची फीस न घेता अंगदुखी कंबरदुखी डोकेदुखी सर्दी ताप खोकला या सर्व आजाराचं आज या ठिकाणी तपासणी करून मोफत औषध व गोळ्या दिल्या जात आहेत हे शिबिर औसा तालुक्यातल्या संपूर्ण 110 गावांमध्ये घेतला जाणार असून जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी केले शिवसेनेचे तालुकाप्रमुख तानाजीराव सुरवसे या संपूर्ण तालुक्यातील शिबिरासाठी अहोरात्र प्रयत्न करत असून त्यांची संपूर्ण टीम शिबिर यशस्वीतेसाठी लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत या संपूर्ण टीमने तालुक्यातील संपूर्ण गावांमधील व्यवस्थित नियोजन करून सदरील शिबिर हे लोकांना आपलं वाटलं पाहिजे शिवसेनेचा उपक्रम सर्व जनतेपर्यंत पोहोचवावा अशी आव्हान जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी केले यावेळी उपस्थित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख  शिवाजीराव माने  औसा तालुक्याचे  दिनकरराव माने शिवसेना औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे   शिवसैनिक व माजी तालुका प्रमुख दिलीप भाऊ सुर्यवंशी  उपतालुका प्रमुख आबासाहेब  उपतालुका प्रमुख संतोष भाऊ सुर्यवंशी, सर्कल प्रमूख महादेव साळुंखे, उप सर्कल प्रमुख अनिल चव्हाण, सरपंच मोहन कावळे, उप सरपंच बाजीराव जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष महादेव गुरूजी सुर्यवंशी, शाखा प्रमुख दयानंद महाडिक, संभाजी सूर्यवंशी ,अंगद माने ,रमेश कुलकर्णी ,श्रीकृष्ण चव्हाण महाराज ,गोरोबा जाधव ,श्रीकृष्ण सगर ,सतीश सूर्यवंशी ,विलास सूर्यवंशी ,मधुकर सूर्यवंशी ,अक्षय सूर्यवंशी ,प्रदीप सूर्यवंशी ,नाना पाटील सूर्यवंशी, सुरज सूर्यवंशी, शिवसैनिक व तूंगी गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *