• Sun. May 5th, 2024

जलयुक्त जिल्हा ज्ञानयुक्त लातूर जिल्हा  केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही-माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर

Byjantaadmin

Jun 21, 2023
जलयुक्त जिल्हा….ज्ञानयुक्त लातूर जिल्हा  केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
वाढदिवसाच्या दिवशी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा संकल्प
निलंगा(प्रतिनीधी ) भिषण दुष्काळी स्थितीमुळे मागील काळात लातूरसाठी रेल्वेने पाणी आणावे लागले विविध पक्षातील लोकप्रतिनीधी त्यांच्या-त्यांच्या पध्दतीने  राजकारण करत असतात पावसाचे वाहून जाणारे पाणी आडवून लातूर जिल्हा जलयुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा संकल्प मंगळवारी ता. २० रोजी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला.
माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील मंगल कार्यालयात भव्य सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, माजी आमदार धर्माजी सोनकवडे, लोकसभा प्रमुख दिलीप देशमुख, जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष राहूल केंद्रे, मिलिंद लातूरे, उपाध्यक्ष भारतबाई सोळूंके, किरण उटगे यासह आदीची यावेळी उपस्थिती होती. यावेळी संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, आपण सर्वच राजकारण करत असतो मात्र जिल्ह्यातील अवर्षण स्थितीबाबत उपाययोजना करणे गरजेचे असून त्याबाबतची जबाबदारी स्विकारण्याची गरज आहे. जिल्ह्यातून मांजरा व तेरणा या दोन नद्या वाहत असल्या तरी मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. हे पाणी आपल्या भागात अडवून संपूर्ण जिल्हा जलयुक्त कसा होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी शासन स्तरावरून लागाणारा निधी खेचून आणू प्रसंगी जनआंदोलन उभे करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. लातूरला पाण्याची गरज आहे.  वाहून जाणारे पाणी जोपर्यंत जोडणार नाही तोपर्यंत हा भाग सुजलम सुफलम होणार नाही शिवाय आपण शांत बसणार नाही. शिवाय लातूर ही शिक्षणाची पंढरी आहे हजारो विद्यार्थी डाॕक्टर, इंजिनियर येथे होतात शैक्षणिक लातूर पॕटर्न हा गेल्या अनेक वर्षापासूनचा असतानाही येथे केंद्रीय विद्यापीठ नाही त्यासाठी लातूर येथे केंद्रीय विद्यापीठ होण्याची गरज असून जलयुक्त लातूर व केंद्रीय विद्यापीठ या प्रमुख मागण्या घेऊन १५ आॕगस्टपासून कामाला लागणार आहोत. केंद्रात व राज्यामध्ये भाजपाचे सरकार आहे त्यामुळे निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असून शासन दख्खल घेत नसेल तर आंदोलने उभे करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला. घरातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे माझा कार्यकर्ता नव्हे तर कुटूंबातील व्यक्ती आहे असे आम्ही समजतो. सर्वात मोठं व्यक्तीमत्व बनवलं आमदार झालो मंत्री झालो जनतेने भरपूर प्रेम दिले. मात्र ८० टक्के मुलं बाहेर रोजगारासाठी बाहेर जात आहेत.  मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. सरकार मधला एक प्रतिनीधी म्हणून बोलतो. जिल्ह्याची मागणी पाणी आहे. यासाठी प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले.
संभाजीराव खुप मोठे व्हावे अन् राज्याचे नेतृत्व करावे-माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर
गेल्या २४ वर्षापासून या जनतेने संभाजीला सांभाळले आहे. मी त्यांना जन्म दिला असला तरी राजकीय जन्म देणारी जनता आपण आहात. अतिशय साधेपणा सातत या भागातील मतदारांसाठी कांहीना काही केले पाहीजे असा विकासाचा ध्यास संभाजी घेत असतात त्यांनी राजकारणात अनेक मोठे अव्हाणे पेलून यशाचे शिखर गाठण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अशी अपेक्षा आई म्हणून सर्वांच्या समोर करत असाल्याचा उच्चार करताच उपस्थित जनसमुदायानी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *