• Thu. May 9th, 2024

युवती सेने तर्फे  औसा तालुक्यात महिलांसाठी प्रशिक्षण

Byjantaadmin

Dec 26, 2023
युवती सेने तर्फे  औसा तालुक्यात महिलांसाठी प्रशिक्षण
औसा:-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवती सेना लातूर तर्फे औसा तालुक्यातील बिरवली येथे  बचतगटच्या महिलांना कायदे विषयी  सल्ला, महिलांनी उद्योग कसे करावे, केंद्र व राज्य शासनाचा योजनाची माहिती व अंमलबजावणी यावर प्रशिक्षण घेण्यात आले.यावेळी
युवती जिल्हा प्रमुख ऍड.श्रद्धा जवळगेकर,युवती विस्तारक लातूर मनीषा वाघमारे,  आदी नी मार्गदर्शन केले.
महिलांनी स्वतः च्या हिमतीवर छोटे छोटे उद्योग सुरू करावे त्या साठी युवा सेना, युवती सेना, शिवसेना नेहेमी सोबत असेल असे आश्वासन  दिले. त्याचप्रमाणे  महिलांना  कायदे विषयी माहिती , शासन योजनाची माहिती , महिला सुरक्षा यावर प्रशिक्षण देण्यात आले यावेळी परिसरातील बिरवली येथील सरपंच उपसरपंच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *