• Mon. Apr 29th, 2024

शिंदे यांच्या आरोपाला अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर, भाजपच्या घराणेशाहीची यादी दिली, फडणवीस ते राणेंचा समावेश

Byjantaadmin

Jan 11, 2024

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या प्रकरणातील एक टप्पा काल पार पडला. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्णय दिला. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांविरोधातील अपात्रता याचिका नार्वेकर यांनी फेटाळल्या. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या १४ आमदारांच्या विरोधातील याचिका देखील नार्वेकर यांनी फेटाळून लावल्या. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हुकूमशाही आणि घराणेशाहीचा आरोप केला. या आरोपाला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या आरोपांना उत्तर देताना भाजपमधील घराणेशाहीचा दाखला दिला आहे.

Ambadas Danve Eknath Shinde

अंबादास दानवे काय म्हणाले?

“मुख्यमंत्री एकनाथ सिंदे ज्या महाराष्ट्रात आपण आणि आपल्या गटाचे ४० आमदार भाजपची पालखी धापा टाकत वाहत आहात, त्याच भाजपची महाराष्ट्रातील घराणेशाही एकदा बघा. २०१९ साली महाराष्ट्रातील भाजपचे विधानसभेचे उमेदवार आणि त्यांचा कौटुंबिक राजकीय वारसा देतो आहे. पाहा, वाचा कारण याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागणार आहे. यापुढे देशाची यादी लागली तरी सांगा..” , असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.

अंबादास दानवे यांनी घेतलेली भाजप नेत्यांची नावं

देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे ,आकाश फुंडकर, संतोष दानवे, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत सावरा, संदीप नाईक भरत गावित, मदन भोसले, स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, देवयानी फरांदे, समीर मेघे, राणाजगजितसिंग पाटील, संभाजी निलंगेकर, राहुल कुल, नमिता मुंदडा, राधाकृष्ण विखे पाटील, वैभव पिचड, नितेश राणेअंबादास दानवे पुढे म्हणाले की रस्त्यावरील शिवसैनिक पारखून, त्याला निवडून आणण्याचे काळीज फक्त शिवसेनेत होते.. आहे आणि राहणार! आयात उमेदवारांची जत्रा तुम्ही तुमच्या खांद्यावर घेऊन फिरत आहात. कायदेशीर लढाया येतील आणि जातील. कायम असेल ती निष्ठा आणि विश्वास, असंही दानवे म्हणाले.दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालानंतर शिवसेनेचे दोन्ही गट सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *