• Sat. May 4th, 2024

शेतकऱ्यांना आता घरबसल्या मिळणार कीटकनाशके

Byjantaadmin

Nov 30, 2022

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना  (Farmers) एक मोठा निर्णय घेतला आहे. आता शेतकरी त्यांच्या शेतीसाठी लागणारी कीटकनाशके (Pesticide) घरी बसून मागवू शकतात. कीटकनाशकांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता अन्य ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही. भारतातील अॅमेझॉन (amazon) आणि फ्लिपकार्ट (flipkart) या प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांसह अनेक ई-कॉमर्स कंपन्यांकडून ऑनलाईन कीटकनाशकांची विक्री केली जाणार आहे. कृषी मंत्रालयाने कीटकनाशक नियम 1971 मध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.

मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत 1971 चे नियम बदलण्यात आले असून, कीटकनाशकांच्या व्यापारासाठी परवाना असलेल्या कंपन्या आता सर्व प्रकारची कीटकनाशके ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांना विकू शकतील. यासाठी परवानाधारक कंपन्यांची वैधता ठरवण्याची जबाबदारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किटकनाशके थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहोच व्हावी असी प्रकारची मागणी केली जात होती. ती किटकनाशके शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची परवानगी कंपन्यांना मिळावी अशी मागणी करण्यात येत होते. अखेर किटकनाशकांची विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या मागणीला यश आलं आहे. यामुळं किटकनाशक उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्राशी संबंधित व्यवसायाचा विस्तार होण्यासही मदत होईल, असे कंपन्यांचं म्हणणं आहे.

कीटकनाशके थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहोचवल्यास शेतकऱ्यांचा वेळही वाचणार आहे. शेतकऱ्यांना चांगली कीटकनाशके देखील उपलब्ध होतील. ही कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना कुठेही जावं लागणार नाही. घरपोच त्यांना कीटकनाशके मिळणार असल्यानं शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं कंपन्यांनी म्हटलं आहे. भारतातील अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांसह अनेक ई-कॉमर्स कंपन्यांच्या वेबसाइटवर कीटकनाशके उपलब्ध होणार आहेत. त्यामुळं आता शेतकऱ्यांना योग्य व सुरक्षित कीटकनाशके खरेदी करण्यासाठी फारसा पैसा खर्च करावा लागणार नाही. तसेच विनाकारण दुकानांमध्ये फिरण्याची  गरज पडणार नाही. शेतकरी फक्त ऑनलाइन ऑर्डर देऊन किटकनाशकांची होम डिलिव्हरी मिळवू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *