• Fri. May 10th, 2024

केंद्रातील भाजपा सरकारने गेल्या दहा वर्षांत देशवासियांची फसवणुक केली-श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख

Byjantaadmin

Apr 27, 2024

केंद्रातील भाजपा सरकारने गेल्या दहा वर्षांत देशवासियांची फसवणुक केली
लातूर : प्रतिनिधी
‘सबका साथ सबका विकास’, अशी घोषणा केंद्रातील भाजपा सरकारने दिली परंतू, सबका साथ घेत मुठभरांचा विकास केला आणि देशवासियांना फसवले़ त्यामुळे आताया फसविणुकीचा जाब विचारण्याची वेळ आली असून मतदारांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ़ शिवाजी काळगे यांना प्रचंड मतांनी विजयी करुन आपल्या फसवणुकीचा बदला घ्यावा, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले़
लातूर लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ़ शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ लातूर तालुक्यातील बोरी येथे उपसरपंच शंकरराव पाटील यांच्या निवासस्थानी दि़ २५ एप्रिल रोजी सायंकाळी महिला मेळाव
झाला़ त्याप्रसंगी प्रमुख पाहूण्या म्हणून श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख बोलत होत्या़ यावेळी सुनीता अरळीकर, सरपंच विजयमाला शिंदे, बोकनगावच्या सरपंच सुरेखा स्वामी, मुशिराबाच्या सरपंच कमलबाई मलवाडे, महाराणाप्रतापनगरच्या सरपंच संगीता पंतगे, जिल्हा परिषेचे माजी सदस्य दगडूसाहेब पडिले, बोरी ग्रामपंचायतच्या सदस्या शिवगंगा केजकर, सुकन्या स्वामी, कविता बडे, वच्छला बडे, सविता केजकर, रुक्मिणी बनाळे, बालाकी ठाकूर, नानासाहेब पाटील, शालिक थोरमोटे, शरद पाटील, दत्ता पाटील, अंकुश बेबळे, शिवशंकर स्वामी, अशोक केजकर, प्रेम पाटील यांची प्रमुख उपस्थिती
होती़ पुढे बोलताना श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख म्हणाल्या, काँग्रेस पक्षाने ठरवले आहे, सरकार येताच शेतीसाठी हमीभाव काँग्रेस देणार आहे, मुला-मुलींना ज्यांचे एज्युकेशन झाल्यास त्यांना पक्की नोकरी काँग्रेस देणार आहे़ शेतकºयांची कर्जमाफी केली जाणार आहे, रोजगारांना चारशे रुपये रोजगार मिळणार आहे, सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना ३० लाख नोकºया देण्याचे काम आपले सरकार आल्यानंतर होणार आहे़ महिलांना एक लाख महालक्ष्मी योजनेतून वर्षाला देण्याचे काम काँग्रेस करणार आहे तसेच महिलांना ५० टक्के आरक्षण मिळणार आहे़ विमा रक्कम थेट शेतकºयांच्या खात्यात ३० दिवसाच्या आत मिळणार आहे त्यामुळे मतदारांनी काँग्रेस महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ़ शिवाजी काळगे यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन केले़ प्रास्ताविक मधुमाला पांचाळ तर सूत्रसंचालन व आभार श्रद्धा चिद्रेवार यांनी केले. या महिला मेळाव्यास महिला भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या़.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *