• Fri. May 10th, 2024

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मोदी सरकारला हटवा प्रियांका गांधी यांचे आवाहन

Byjantaadmin

Apr 27, 2024

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मोदी सरकारला हटवा प्रियांका गांधी यांचे आवाहन

उदगीरच्या इतिहासात सर्वात मोठी सभा लोकांची मोठी गर्दी

उदगीर दि. २७.
हरिराम कुलकर्णी

मोदी सरकारने देशातील १६ लाख करोड रुपये उद्योजकांची कर्ज माफ केली मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम भाजपा सरकारने केलें असून या सरकारचा पापाचा घडा भरलेला आहे लोकांशी दिशाभूल करणाऱ्या सरकारला हटवा इंडिया आघाडीला सत्तेवर आणा असे आवाहन आखिल भारतीय काँगेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केले आहे त्या उदगीर येथे जिल्हा परिषद क्रीडा संकुल येथे लातूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली त्यावेळीं त्या बोलत होत्या यावेळी जाहीर सभेला मोठया प्रमाणावर गर्दी झाली होती.

मोदी सरकारवर सडकून टीका

यावेळी बोलताना प्रियांका गांधी यांनी गेल्या १० वर्षात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारचा बुरखा फाडला शेतकरी, शेतमजूर,युवकांना रोजगार नाही, महागाई वाढली गॅस डिझेल दरवाढ केली हे किती दिवस तुम्ही सहन करणार असा सवाल करत या सरकारला सत्तेचा अहंकार वाढलेला आहे संविधान बदलण्याची भाषा करत आहेत या सरकारने ३० लाख सरकारी नोकरी रिक्त पदे भरलेले नाहीत याकडे लक्ष देण्याची गरज आहे हीच योग्य वेळ आहे त्यामुळे मतदान करीत असताना थोडा विचार करा येणाऱ्या सरकारचे भविष्य तुमच्या हातात आहे एक चांगले सक्षम सरकार इंडिया आघाडी च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले

यावेळी राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आमदार धीरज विलासरावजी देशमुख, वैशालीताई विलासरावजी देशमुख, सौ दीपशिखा धीरजजी देशमुख,अशोकराव पाटील निलंगेकर, कोंग्रेसचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे, बसवराज पाटील नागराळकर, निरीक्षक रवींद्र काळे, कल्याण पाटील, शिवाजी हुडे, श्रीकांत पाटील सौ उषा कांबळे शिलाताई पाटील, बालाजी रेड्डी श्रीशैल्य उटगे, अँड किरण जाधव विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

यावेळी प्रियांका गांधी यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या कार्याची आठवण काढताना म्हणाल्या या भागात लोकांसाठी काम करीत असताना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उद्योग उभे केले येथे विकासाची गंगा आणली आजही त्यांच्या कुटुंबाकडून कार्य सुरू आहे असा त्यांनी आवर्जून उल्लेख केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *