• Sun. May 5th, 2024

लातूर जिल्हा रुग्णालयास जागेचा ताबा मिळणेसाठी कृषि विभागाला पावणे तीन कोटी निधी देण्याची कार्यवाही करावी-माजी मंत्री आमदार अमित देशमुख

Byjantaadmin

Feb 1, 2023

 

लातूर जिल्हा रुग्णालयास जागेचा ताबा मिळणेसाठी कृषि विभागाला पावणे तीन कोटी निधी देण्याची कार्यवाही करावी

सार्वजनीक आरोग्यमंत्री प्रा.तानाजी सावंत, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख तसेच संबधित अधिकारी यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीत लातूर जिल्हयातील आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणासाठी सकारात्मक चर्चा

 मुरुड ट्रॉमा केअर सेंटर बांधकामासाठी 28.99 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळावी

रेणापूर येथे ट्रॉमा केअर सेंटर मंजूर करावे. अहमदपूर ट्रॉमा केअर सेंटरच्या दूसऱ्या टप्पयातील बांधकामासाठी निधी उपलब्ध करावा.

 श्रेणीवर्धन झालेलया निलंगा उपजिल्हा रुग्णालय बांधकामास निधी उपलब्ध व्हावा.

 लातूर स्त्री रुग्णालयात नियमित स्त्री रोग तज्ञांची नियुक्ती व्हावी.

उदगीर येथील रुग्णालयात रिक्त जागांवर वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या नियुक्याव् कराव्यात.

बाभळगाव ग्रामीण रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया केंद्र उभारावे.

 जिल्याळततील प्राथमिक आरोगय केंद्रासाठी पुरेशे मनुष्यबळ व तांत्रिक साहित्य देण्यात यावे.

शिरूर अनंतपाळ, औराद शहाजनी, या नव्या रुग्णालयात आवश्यक तांत्रिक उपकरणे व मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे

मुंबई : (प्रतिनिधी)लातूर येथे मंजुर असलेल्‌या जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जागेचा ताबा मिळण्याच्या दृष्टीने कृषि विभागाला 2 कोटी 82 लाख 57 हजाराचा निधी त्वरित वर्ग करावा. मुरुड येथील ट्रॉमा केअर सेंटर इमारतीसाठी 28.99 कोटीच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात यावी त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील आरोगय सेवेच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश राज्याचे सार्वजनीक आरोग्यमंत्री प्रा.तानाजी सावंत यांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
लातूर जिल्ह्यातील आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने विविध सेवा सुविधांची उभारणी करण्यात यावी. या संबधिंच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी राज्याचे सार्वजनीक आरोग्यमंत्री प्रा.तानाजी सावंत यांना दिले होते. या निवेदनाच्या अनुषंघाने सार्वजनीक आरोगय मंत्री प्रा.तानाजी सावंत यांनी आज त्यांच्या दालनात संबधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीस माजी मंत्री अमित विलासराव देशमुख हेही आर्वजुन उपस्थित होते. या वेळी आरोग्यमंत्री प्रा.सावंत यांनी आमदार देशमुख यांच्या समवेत लातूर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या संदर्भाने सविस्तर चर्चा केली. चर्चे दरम्यान लातूर जिल्ह्यातील आरोगय सुविधेत असलेल्या त्रुटी दूर करुन ही सेवा अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले.
लातूर येथे जिल्हा रुग्णालय मंजूर असून त्यासाठी निधीही उपलब्ध करुन दिलेला आहे. रुग्णालय उभारणीसाठी कृषि महाविद्यालयाची काही जागा हस्तांतरीत करण्यात आली आहे. शासन नियमानूसार या जागेचे मूल्य 2 कोटी 82 लक्ष 57 हजार रुपये कृषि विभागाला वर्ग करणे आवश्यक आहे. रुग्णालय बांधकाम सुरु होण्याच्या दृष्टीने कृषि विभागाला जागेचे मूल्य त्वरीत देणे आवश्यक असलेल्याची बाब आमदार देशमुख यांनी सार्वजनीक आरोग्य मंत्री प्रा.तानाजी सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली. आरोग्यमंत्री प्रा.सावंत यांनी या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबधिंत अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
*मुरुड, अहमदपूर, रेणापूरसाठी ट्रॉमा केअर सेंटर*
ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे ट्रॉमा केअर सेंटर बांधकामासाठी 28.99 कोटीच्या अंदाजपत्रकास मंजुरी द्यावी. अहमदपूर येथील ट्रॉमा केअर सेंटर च्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा त्याचबरोबर रेणापूर येथे नवीन ट्रॉमा केअर सेंटर मंजुर करावे याबाबतही यावेळी चर्चा होऊन त्या संदर्भाने कार्यवाही करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी संबधिंताना दिले.
*निलंगा, उदगीर उपजिल्हा रुग्णालयात सोयी-सुविधांची उभारणी*
निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे 50 खाटावरुन 100 खाटांचे असे श्रेणीवर्धन करण्यात आले आहे. त्यासाठीच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. लातूर येथील स्त्री रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञांची नेमणूक करण्यात यावी. उदगीर येथील सामान्य रुग्णालयात शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ञ, भीषक वैद्यकिय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात आदी मागणयांबाबत यावेळी चर्चा होऊन सकारात्मक कार्यवाही करण्याबाबत संबधितांना निर्देश देण्यात आले.

*मनुष्यबळ आणि तांत्रिक उपकरणे उपलब्ध करुन द्यावीत*
बाभळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात 20 खाटांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया केंद्र उभारण्यास विशेष बाब म्हणून मंजूरी मिळणेबाबत आमदार देशमुख यांनी यावेळी विनंती केली. त्यास आरोग्यमंत्री प्रा.तानाजी सावंत यांनी अनुकूलता दर्शवली. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोगय सेवक यांची एकूण 405 पदे मंजूर आहेत त्यापैकी 231 पदे रिक्त आहेत. ती त्वरीत भरण्यात यावीत. बाह्य यंत्रणेकडील निधी अभावी कमी केलेले कनिष्ठ सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तज्ञ, परिचर हे मनुष्यबळ तातडीने भरण्यात यावेत आदी मागण्या या वेळी करण्‌यात आल्या त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी कमी असलेली तांत्रिक उपकरणे तातडीने उपलब्ध करुन देण्याबाबतही आरोग्यमंत्री प्रा.सावंत यांनी संबधित अधिकारी यांना सुचना दिल्या. सदरील बैठकीदरम्यान सार्वजनीक आरोग्यमंत्री लातूर जिल्याधितील आरोग्य सुविधा सक्षमीकरणासाठी सकारात्मक राहून निर्णय घेतल्याबद्यल माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *