• Mon. May 6th, 2024

भाजपच्या रासनेंनंतर आता आघाडीचे उमेदवार धंगेकर यांच्यावरही गुन्हा दाखल

Byjantaadmin

Feb 27, 2023

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल (रविवारी) मतदान झाले. राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या कसबा पेठच्या पोटनिवडणुकीत मतदानानंतरही वाद संपण्याचे नाव घेत नाही.भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मतदानाच्या आदल्या दिवशी (शनिवारी) कसबा पेठेत भाजपचे पदाधिकारी हे मतदारांना पैसे वाटत होते, असा आरोप करीत धंगेवर यांनी केला होता. त्यानंतर ते उपोषणास बसले होते. आचारसंहिता असताना त्यांनी कसबा गणपती समोर उपोषण केल्याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.BJP उमेदवार हेमंत रासने यांनी कमळाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान करुन मतदान केले होते, याप्रकरणी रासने यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे

कमळाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान करुन मतदान केलेल्या रासने यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केली होती

कसबा (Kasba) विधानसभा मतदार संघ 2009 मध्ये अस्तित्वात आला. या मतदार संघात दोन लाख 75 हजार 428 मतदार आहेत. कसब्यात 2009 मध्ये 49.7 टक्के, 2014 मध्ये 61.57 टक्के, तर 2019 मध्ये 51.62 टक्के मतदान झाले होते.

कसबा पेठ पोटनिवडणूक अनेक कारणामुळे चर्चेत आहे. मतदार यादीत नाव नसल्याने काही ठिकाणी मतदारांना मतदान करता आले नाही. तर काही मतदार याद्यांमध्ये मयतांची नावे आहेत. त्यामुळे अनेकांना मतदानाचा अधिकार बजावण्यात आला नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. निकाल २ मार्चला आहे.

पुण्यात भाजपला एकापाठोपाठ धक्के, तीन नेत्यांवर गुन्हे दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *