• Fri. May 3rd, 2024

फिफ्टी-फिफ्टी’ने वाढविली उमेदवारांची धाकधूक; मतदानाची टक्केवारी काय सांगते?

Byjantaadmin

Feb 27, 2023

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. 26 फेब्रुवारी) मतदान काही अपवाद वगळता शांततेत पार पडले. मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली होती. या दोन्ही ठिकाणी सकाळपासूनच अत्यंत संथगतीने मतदान झाले. दुपारी एक वाजेपर्यंत मतदारांनी निरुत्साह दाखविला. त्यानंतर मतदानाचा वेग वाढला. दुपारी तीननंतर मतदारांनी मतदान केंद्राबाहेर लांब रांगा लावल्या होत्या.

या पोटनिवडणुकीसाठी चिंचवडला 50.47 टक्के तर कसब्यात 50.६ टक्के मतदान झाले. दरम्यान दिवसभर चिंचवडकरांनी उत्साह दाखविला. तर दुपारनंतर कसब्यात मतदानाची टक्केवारी वाढल्याचे पाहावयास मिळाली. सायंकाळी सहा वाजता नियमानुसार मतदान केद्रांत कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे उशीर झाल्याने अनेकांना मतदान करता आले नाही.

या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 3.52 टक्के, तर कसब्यात 6.5 टक्के मतदान झाले होते. सकाळी 11 वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 10.45 टक्के तर कसब्यात 8.25 टक्के मतदान झाले. दुपारी एक वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 20.68 टक्के तर कसब्यात 18.5 टक्के मतदान झाले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत चिंचवडला 30.55 टक्के तर कसब्यात 30.5 टक्के मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 41.1 तर कसब्यात 45.25 टक्के मतदान झाले होते.

दरम्यान, दुपारी तीन वाजल्यानंतर चिंचवड आणि कसब्यात अनेक मतदान केंद्रावर मतदारांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. मात्र मतदानाची वेळ संपल्याने अनेकांना मतदान करता आले नाही. त्यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे दोन्ही ठिकाणी मतदानाच्या टक्क्यावर काही अंशी परिणाम झाला आहे.

पुण्यात भाजपला एकापाठोपाठ धक्के, तीन नेत्यांवर गुन्हे दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *