• Fri. Apr 26th, 2024

लातूर शहर महानगरपालिका, लातूर शााळाक्र.२ काळे गल्‍ली लातूर येथील हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दावाखाना

Byjantaadmin

Apr 30, 2023

लातूर शहरातील सर्व नागरीकांना कळविण्‍यात येते की, लातूर शहर महानगरपालिकेमार्फत १ मे रोजी महाराष्‍ट्र दिन व कामगार दिनाच्‍या पार्श्‍वभुमीवर लातूर शहर महानगरपालिका शाळा क्र.२ काळे गल्‍ली, लातूर येथे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्‍यात येणार आहे. शहरी भागातील दवाखाने अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाने स्‍मार्ट बनवण्‍यासाठी, सातत्‍यपुर्ण, आरोग्‍य सेवा देण्‍यासाठी, विविध रोगांच्‍या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्‍यासाठी तसेच सुलभ आणि परवडणारी शहरातील गरीब रुग्‍णासाठी जागतीक दर्जाची दर्जेदार आरोग्‍य सेवा प्रदान करण्‍यासाठी व आरोग्‍य निर्देशांक वाढवण्‍यासाठी हा दवाखाना सुरू करण्‍यात आला आहे.

           या ठिकणी दुपारी २ ते रात्री १० या वेळेत बाह्य रुग्‍ण सेवा देण्‍यात येणार आहे. तसेच या ठिकाणी मोफत औषधोपचार, मोफत तपासणी, टेली कन्‍सल्‍टेशनव्‍दारे तज्‍ज्ञाचा सल्‍ला, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, बाह्य यंत्रणेव्‍दारे रक्‍त तपासणी, नेत्र तपासणी, मानसोपचार तज्‍ज्ञ, कान नाक घसा तज्‍ज्ञ, एक्‍स-रे साठी संदर्भ सेवा, आवश्‍यकतेनुसार विशेषज्ञ संदर्भ सेवा, ई. सेवा बाह्यरुग्‍ण वेळेमध्‍ये उपलब्‍ध असणार आहेत. या ठिकाणी सदरील सेवा देण्‍यासाठी वैद्यकीय अधिकारी, स्‍टाफ नर्स, बहुउदेशीय कर्मचारी, मदतनीस ई. अधिकारी / कर्मचारी सेवा देण्‍यसाठी तत्‍पर आहेत.

           तरी शहरातील नागरीकांना लातूर शहर महानगरपालिका आरोग्‍य विभागामार्फत जाहिर अवाहन करण्‍यात येते की, या आरोग्‍य सुविधेचा लाभ घ्‍यावा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *