• Sat. Apr 27th, 2024

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा आज निकाल जाहीर

Byjantaadmin

Apr 30, 2023

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेला विजय ऐतिहासिक, राज्य सरकारचे दिवस भरले : विजय वडेट्टीवार

 

चंद्रपूर : पोभुर्णा बाजार समिती महाविकास आघाडीकडे: मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मोठा धक्का

अमळनेर बाजार समितीवर आजी-माजी आमदारांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या पॅनेलचा झेंडा. महाविकास आघाडीच्या शेतकरी सहकार पॅनलचा १८ पैकी १२ जागांवर विजय

जळगाव : बोदवड बाजार समितीवर महाविकास आघाडीची एकहाती सत्ता. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी गड कायम राखला. शिंदे गटाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटलांना मोठा धक्का

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा, १६ जागा जिंकल्या

अहमदनगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना सलग चौथ्यांदा यश. सर्व १८ जागा जिंकल्या. महाविकास आघाचे नेते व कर्डिले यांचे सोयरे प्रा. शशिकांत गाडे यांच्या मंडळांचा पुन्हा पराभव

बालेकिल्लातील जामनेर बाजार समितीवर भाजपच्या पॅनलचे एकहाती सत्ता.

नाशिक : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे वर्चस्व, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १३ जागा मिळवत दोन अपक्षांसह एकूण १५ जागांवर भुजबळ यांच्या गटाचे उमेदवार विजयी.

अहमदनगर : कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वसाधारण गटातील ११ पैकी ७ जागा भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या पॅनलने जिंकल्या, तर राष्ट्रवादीचे आमदार रोहितदादा पवार यांच्या पॅनलला ४ जागा.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीची सत्ता कायम. राष्ट्रवादीचे १७ उमेदवार विजयी.

अकोला बाजार समितीवर राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपप्रणीत सहकार आघाडीची सत्ता आली आहे. या बाजार समितितील सर्व १८ जागांवर एकतर्फी विजय झाला आहे. तर वंचित समर्थित पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडाला

सांगली : इस्लामपूर बाजार समितीत राष्ट्रवादीचं वर्चस्व, १८ पैकी १७ जागा जिंकल्या

भूम कृषी उत्पन्न बाजार समितीवर युतीचा झेंडा, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत गटाचे १३ उमेदवार विजयी, भाजपाने ४ जागा जिंकल्या, महाविकास आघाडीला १ जागा.

पंढरपूर बाजार समिती मतमोजणीमध्ये भाजपच्या प्रशांत परिचारक गटाची सर्व १३ जागांवर विजयी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *