• Fri. Apr 26th, 2024

कसबा पेठ पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी घरोघरी पैसे वाटले? रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप

Byjantaadmin

Feb 27, 2023

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल ( रविवारी ) मतदान पार पडलं. अवघ्या राज्याचं या पोटनिवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. पण, मतदानानंतरही येथील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. भाजपा उमेदवार हेमंत रासने यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

शनिवारी ( २५ फेब्रुवारी ) कसबा पेठेत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता. त्यानंतर ते उपोषणास बसले होते. आचारसंहिता सुरु असताना कसबा गणपती समोर उपोषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच आता रवींद्र धंगेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत.

टीव्ही ९ मराठी’शी बोलताना रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं की, “निवडणूक संपल्यानंतर मुख्यमंत्रीरात्री ८ वाजेपर्यंत पैसे वाटत फिरत होते.CHANDRAKANT PATIL आणि प्रवीण दरेकरही पोलिसांच्या उपस्थितीत फिरत होते. माझ्यावर गुन्हा दाखल केला, मग त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. हा पक्षपातीपणा कशा करायला हवा.”

“मुख्यमंत्र्यांनी ज्या घरात पैसे वाटले, ते घर माझं आहे. पण, निवडणूक यंत्रणा ही भाजपाचं कार्यालय झालं आहे. हेमंत रासनेंनी म्हटलं कसबा हा भाजपाचा गढ आहे. मात्र, हा जनतेचा गढ आहे. ही लढाई धनशक्ती आणि जनशक्तीची होती. जनशक्तीच्या मागे जनता होती. धनशक्तीच्या मागे ज्यांनी पैसे घेतले, ते होते. काही लोकांनी पैसे घेतले आणि मत धंगेकरांना देणार असं सांगितलं. परंतु, १५ ते २० हजार मतांनी माझा विजय होणार आहे,” असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला.

भाजपच्या रासनेंनंतर आता आघाडीचे उमेदवार धंगेकर यांच्यावरही गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *