• Sat. Apr 27th, 2024

नवीन लूकमध्ये राहुल गांधी:ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठात पोहचले; दाढी केली सेट, कोट-टायमध्ये दिसले

Byjantaadmin

Mar 1, 2023

राहुल गांधी केंब्रिज जज बिझनेस स्कूलमध्ये पोहोचले आहेत. येथे त्यांचा नवा लूक पाहायला मिळाला. राहुल गांधींचा हा लूक चांगलाच चर्चेत आला आहे. 7 सप्टेंबर 2022 रोजी, भारत जोडो यात्रा सुरू झाल्यानंतर राहुल यांनी दाढी वाढवली होती. केंब्रिजला पोहोचल्यानंतर त्यांचा पहिला फोटो समोर आला, तेव्हा तब्बल 6 महिन्यांनंतर ते दाढी सेट केलेले दिसले.

केंब्रिज जज स्कूलने आपल्या ट्विटर हँडलवर राहुल यांच्या भेटीचा आणि त्यांच्या भाषणाचा विषय शेअर केला आहे. राहुल बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत भारत जोडो यात्रेचे अनुभव शेअर करणार आहेत. त्यांचा विषय लर्निंग टू लिसन इन द 21st सेंच्युरी असा आहे. दरम्यान, ते भारत जोडो यात्रेचे दोन भिन्न दृष्टिकोन आणि जागतिक परिवर्तनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींबद्दल बोलतील.

राहुल यांनी केले ट्विट – मी भाषण देण्यासाठी तयार आहे
16 फेब्रुवारी रोजी केंब्रिज विद्यापीठातील भाषणावर राहुल गांधी यांनी ट्विट केले होते. ते म्हणाले की, मी भाषण देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ते म्हणाले की, मला आनंद आहे की मला आंतरराष्ट्रीय समस्या, आंतरराष्ट्रीय संबंध, डेटा आणि लोकशाही या विषयांवर जगातील सर्वोत्तम लोकांशी संवाद साधायला मिळेल.

मे 2022 मध्ये केंब्रिजमध्ये भाषणही दिले होते, मोदींवरील वक्तव्यावर टीका झाली होती
राहुल गांधी यांनी यापूर्वी मे २०२२ मध्ये केंब्रिज विद्यापीठाला भेट दिली होती. येथे त्यांना आयडियाज फॉर इंडिया या विषयावर बोलायचे होते. यावेळी राहुल गांधी म्हणाले होते की, मोदी सरकार संसद आणि निवडणूक आयोगासारख्या देशातील घटनात्मक संस्थांना त्यांचे काम करू देत नाहीत. त्यांच्या विधानावर भाजपने आक्षेप घेतला होता. देशाच्या पंतप्रधानांवर असे वक्तव्य परदेशात का केले, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

राहुल केंब्रिजचे विद्यार्थी होते, सुरक्षेमुळे दुसऱ्या नावाने पदवी घेतली
राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात रॉल विंची या नावाने शिक्षण घेतले. त्यांनी 1995 मध्ये डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये एमफिल केले. वडील राजीव गांधी यांच्या हत्येनंतर राहुल यांच्या सुरक्षेची सर्वांनाच चिंता सतावत असल्याने हे नाव बदलावे लागले. राहुल यांच्या पदवीवरून वाद सुरू झाला तेव्हा केंब्रिजचे कुलगुरू प्रा. अॅलिसन रिचर्डनेही एक पत्र लिहून राहुलने रॉल विंचीच्या नावाने पदवी घेतल्याचे सांगितले

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *