• Sun. Apr 28th, 2024

गुजरातेत पूल तुटला, 190 हून अधिक ठार:बचाव अधिकारी म्हणाले- पुलाखाली अडकलेले असू शकतात मृतदेह, चिखलामुळे शोधणे कठीण

Byjantaadmin

Oct 31, 2022

गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेतील मृतांची संख्या सोमवारी सकाळपर्यंत 190 हून अधिक झाली आहे. 170 जणांची सुटका करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी 6.30 वाजता ही दुर्घटना घडली होती

हा 143 वर्षे जुना पूल 6 महिने बंद होता. नुकतीच त्याची दुरुस्ती करण्यात आली. 25 ऑक्टोबर रोजी तो सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आला. रविवार असल्याने गर्दी वाढली. यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक (02822243300) जारी केला आहे. जखमींवर उपचारासाठी मोरबी आणि राजकोटच्या रुग्णालयात आपत्कालीन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत.

  • सकाळपासून लष्कर, NDRF आणि SDRFच्या तुकड्यांचं बचावकार्य सुरू आहे. मच्छू नदीतील पाणी कमी करण्यासाठी चेकडॅम तोडण्यात येत आहे.
  • याप्रकरणी ब्रिजच्या व्यवस्थापन कंपनीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
  • पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये होणारा रोड शो रद्द. पंतप्रधान केवडियाहून मोरबीला जाऊ शकतात.

 

प्रत्यक्षदर्शींच्या तोंडून, दुर्घटनेची भयावह कहाणी

पहिला प्रत्यक्षदर्शी : 1000 हून अधिक लोक जमले होते

या दुर्घटनेत 8 लोकांचे प्राण वाचवणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, येथे हजाराहून अधिक लोक उपस्थित होते. ज्यांना पोहता येत होतं ते पोहत बाहेर पडत होते. मुले बुडत होती, आम्ही त्यांना आधी वाचवले. त्यानंतर ज्येष्ठांना बाहेर काढण्यात आले. पाइपच्या साहाय्याने लोकांना बाहेर काढले जात होते.

. आरोप

निवडणुकीच्या घाईत भाजपने हा पूल जनतेसाठी लवकर खुला केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले- गुजरातच्या मोरबी येथील पूल दुर्घटनेची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, अपघातात जखमी झालेल्यांना सर्वतोपरी मदत करावी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *