• Sat. Apr 27th, 2024

शिरूर अनंतपाळ येथे सहआयुक्त रामदास कोकरे यांनी केली पाहणी

Byjantaadmin

Oct 31, 2022

शिरुर अनंतपाळ (प्रतिनिधी):-शहरातील कुमारस्वामी नगर परिसरातील प्रभाग.13 मधील ओला व सुका कचरा वर्गीकरणाची जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपरिषद प्रशासन सहआयुक्त रामदास कोकरे यांनी पाहणी करुन समाधान व्यक्त केले.शहरातील कुमारस्वामी नगर परिसरातील प्रभाग.13 मधील विवीध घरोघरी दारोदार प्रत्यक्ष जाऊन ओला, सुका कचरा वर्गीकरणाची व प्लाँंस्टीक वापरावर आळा घालुन पुर्णपणे बंदी संदर्भात लातुर जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपरिषद प्रशासन सहआयुक्त रामदास कोकरे यांनी पाहणी करुन प्रभाग.13 मधील नागरिकांनी ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे अनुकरण केल्याबद्दल समाधान व्यक्त केले:-

यावेळी श्री.कोकरे म्हणाले की, ओला व सुका कचरा, प्लाँंस्टीक, कागदे जनतेने आपल्या कचरासोबतच वेगवेगळा करु दिला की स्वच्छता कामगार यांचा वेळ वाचणार आहे..ओला कचरापासुन खतर्निमीती व सुका कचरा पासुन आपल्या नगरपंचायतीला भविष्यात चांगले ऊत्तपन्न प्राप्त होऊ शकते व नगरपंचायतीला व प्रभागाला महाराष्ट्र शासनातर्फे स्वच्छता पुरस्कार व मोठ्या प्रमाणात निधी मिळु शकतो..त्यामुळे शिरुर अनंतपाळ शहरातील ईतर प्रभागांनी 13 प्रभागासारखे अनुकरण करावे असे श्री.कोकरे यांनी ऊपस्थीतांना सांगीतले व प्रभागाचे कर्तव्यदक्ष नगरसेवक सुधीर लखनगावे व नगरपंचायत प्रशासनाचे अभिनंदन केले.
यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे, अभियंता. संतोष गायकवाड, अभियंता ज्योती वलांडे, प्रभागाचे कर्तव्यदक्ष नगरसेवक. सुधीर लखनगावे, महाविकास आघाडीचे गटनेते अनंत काळे सभापती. संतोष शिवणे,माधव संभाळे, सतिश शिवणे,महादेव खरटमोल ई.नगरसेवकांसह नगरपंचायतीचे कर्मचारी ताथोडे सुरज, राजकुमार बोराळे, अजय पानगावे, विद्यासागर वाले, मल्लीकार्जुन आयतनबोणे यांच्यासह स्वच्छता कामगार मोठ्या संख्येने ऊपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *