• Sat. Apr 27th, 2024

भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी काँग्रेस भवन लातूर येथे आपल्या नावाची नोंदणी करावी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन

Byjantaadmin

Oct 31, 2022

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेत ११ नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यातील हिवरे / चोरांबा फाटा येथे होणाऱ्या स्वागत समारंभास लातूर जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी काँग्रेस भवन लातूर येथे आपल्या नावाची नोंदणी करावी

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन

 

लातूर(प्रतिनिधी):-काँग्रेस पक्षाचे नेते मा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी पासून निघालेली भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर २०२२ रोजी तेलंगणा राज्यातून महाराष्ट्र राज्यात देगलूर येथे प्रवेश करणार आहे. या यात्रेचे ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता हिंगोली जिल्ह्यातील हिवरे / चोरांबा फाटा येथे लातूर जिल्ह्यातील जनतेच्या वतीने स्वागत करण्यात करण्यात येणार आहे. यावेळी लातूर जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले आहे.माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची भावना वाढीस लागून देशाची एकात्मता अधिक मजबूत व्हावी म्हणून काँग्रेस पक्षाचे नेते खासदार मा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेस प्रारंभ झाला आहे, विविधतेतून एकता साधणाऱ्या या यात्रेच्या माध्यमातून खासदार राहुलजी गांधी देशभरातून ३७५० किलोमीटरचा पायी प्रवास करणार आहेत, दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यात या यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून लाखोच्या संख्येने विविध स्तरातील नागरिक यात्रेत सहभागी होत आहेत.

राज्यात भारत जोडो यात्रेचे आगमन

७ नोव्हेंबर रोजी ही भारत जोडो यात्रा तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे प्रवेश करणार आहे, नांदेड जिल्ह्यातील चार दिवसाच्या प्रवासानंतर ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता सदरील यात्रा हिंगोली जिल्ह्यात हिवरे / चोरांबा फाटा येथे प्रवेश करणार आहे.
लातूर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी भव्य स्वागत करण्यात येणार आहे,
लातूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व जनतेने या ठिकाणी भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित राहून पुढे यात्रेत सहभागी व्हायचे आहे, हिंगोली जिल्ह्यात या यात्रेचा चार दिवसाचा प्रवास असून पुढे वाशिम जिल्ह्यात ही0यात्रा प्रवेश करेल, पुढे अकोला, बुलढाणा जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत
ही यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करील. महाराष्ट्रात नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात ७ ते २० नोव्हेंबर अशा १४ दिवसात0एकूण ३८२ किलोमीटर ही यात्रा प्रवास करणार आहे. या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील जनतेने जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहनही राज्याचे माजी मंत्री तथा आमदारअमित देशमुख यांनी केले आहे.

जाणाऱ्या नागरिकांनी नोंदणी करावी

ज्या नागरिकांना या भारत जोडो यात्रेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी, लातूर काँग्रेस भवन येथे आपल्या नावाची नोंदणी करावी, त्याचबरोबर लातूरजिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना योग्य प्रकारची माहिती द्यावी, त्यांना आवश्यक त्या सर्व प्रकारचे सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *